आपला जिल्हा

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराचे 41 लक्ष रुपये वसूल होणार

बीड —  भाजपच्या जलयुक्त शिवार  योजनेचा तत्कालीन ग्रामविकास मंत्र्यांच्याच  जिल्ह्यात भ्रष्टाचाराच्या वाळूत आलेला निधी जिरला. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील घोटाळ्याप्रकरणी आता अधिकारी-कर्मचार्‍यांकडून 41 लक्ष रुपयांच्या वसूलीची कार्यवाही सुरु झाली आहे.

                        बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला विशेष बाब म्हणजे तत्कालीन ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात ही योजना कागदोपत्री राबवली गेली. याप्रकरणी  तब्बल 138 संस्था, 26 अधिकारी-कर्मचार्‍यांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.या प्रकरणी दक्षता पथकाकडून पाहणी, पंचनामा करुन सादर करण्यात आलेल्या अहवालाआधारे लोकआयुक्तांकडून घोटाळेबाज अधिकारी-कर्मचार्‍यांकडून वसूली करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 35 कोटींच्या घोटाळ्याच्या तक्रारी असून 4 कोटींचा घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. यातील दुसर्‍या तक्रारीच्या अनुषंगाने 41 लक्ष रुपयांची वसूली करण्यात येणार आहे. याची प्रक्रिया आता विभागांतर्गत सुरु करण्यात आली आहे. यातील 50 टक्के रक्कम ही संबंधित कंत्राटादारांकडून वसूल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. लोकायुक्तांच्या आदेशावरुन ही कार्यवाही होत असून पूर्वीच्या दाखल गुन्ह्यात अधिकार्‍यांवर पुन्हा गुन्हे दाखल होणार आहेत. यात 8 जणांचा नव्याने समावेश असणार आहे. यात तत्कालीन कृषी अधीक्षक रमेश भताने यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती  काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी दिली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close