आपला जिल्हा

शिधापत्रिकेसाठी दलालांकडे मोजावे लागतात पैसे

बीड —  धान्य दुकानात नाव येण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्फत अनेकांनी नावाची नोंदणी केली आहे. नाव नोंदणीनंतर ती यादी स्वस्त धान्य दुकानदाराकडे जाते. मात्र त्यांना शिधापत्रीका मिळण्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात आहे. शिधापत्रिकाच नसल्याचे पुरवठा विभागातील संबंधीत लिपीक सांगतो. मात्र ही शिधापत्रिका दलालामार्फत तात्काळ मिळते.
याकामी इकबाल नावाचा दलाल पिवळी शिधापत्रिका, केशरी शिधापत्रीका तो कोनाकडून उपलब्ध करुन देतो. पुरवठा विभागाकडे खरच शिधापत्रिकेचा तुटवडा आहे काय? जाणीवपुर्वक तुटवडा करुन दलालामार्फत वसुली करण्यासाठी केलं जात आहे. याची माहिती घेणे गरजेचे आहे. पुरवठा विभागाला खासगी दलालाची गरज काय? असा प्रश्‍न निर्माण होतो. या प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकारी खाडे यांनी लक्ष देवून शिधापत्रीकेसाठी होणारी लूट थांबवावी अशी मागणी होत असून संबंधीतावर कारवाई करावी .अशी जनतेची अपेक्षा आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close