क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून नर्स वर वार्ड बॉयचा दोन वर्ष बलात्कार

माजलगाव — शहरातील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत असलेल्या एका नर्स महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सतत दोन वर्षे बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी एका युवकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका खाजगी रुग्णालयात मागील काही वर्षापासून ३० वर्षीय विवाहित महिला नर्स म्हणून काम करत होती. तिच्यासोबत या रुग्णालयात वार्ड बॉय म्हणून कार्यरत असलेल्या दादासाहेब तौर वय 23 वर्षे याची व या महिलेची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. या दरम्यान युवकांने महिलेस लग्नाचे आमिष दाखवून दोघेजण एकाच रूममध्ये राहू लागले, या कालावधीत सतत तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला वारंवार लग्न करण्याची मागणी करत होती. मात्र दादासाहेब हा लग्नास टाळाटाळ करू लागला.यामुळे पीडित महिलेने माजलगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दादासाहेब तौर याच्या विरोधात शनिवारी दि.14 जानेवारी रोजी बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपी फरार असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.बी.धिरज कुमार बच्चू तपास करीत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button