आपला जिल्हा

बीड जिल्हयात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना ई-पास देऊ नये, 16 चेक पोस्टवर निगराणी

      • जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पत्र

बीड — बीड जिल्हयात दिनांक १ आॅगस्ट २०२० पासून लॉकडाऊनची मुदत वादविण्यात आली असून त्यामुळे जिल्हयात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना देण्यात येणारे ई परवाने स्थगित ठेवण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्यातील इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पाठवले आहे

कोवीड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यात अनलॉकची अंमलबजावणी केली जात आहे. राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमध्ये अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, कामगार इत्यादींना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व मा.पोलीस आयुक्त यांचेकडून ई परवाने दिले जातात.

त्यामुळे इतर जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागामधून बीड जिल्हयामध्ये येण्यासाठी दैनंदिन किंवा इतर स्वरुपातील प्रवासाचे कोणतेही ई परवाने, इतर परवानग्या दिनांक ३१ आॅगस्ट २०२० पर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येवू नयेत. केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवाशी असल्यास आधारकार्ड पत्यानुसार परवानगी द्यावी असे नमूद केले आहे

यातून केवळ मालवाहतूक, अत्यावश्यक सेवा संबंधीच्या व्यक्तींना व वाहनांना सुट दयावी अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे

    • जिल्ह्यात येणार्‍यांना संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेसाठी  निर्देश जारी

जिल्हयामध्ये प्रवेश करण्यासाठी16 चेक पोस्ट निश्चित

बाहेरच्या जिल्हयामधून बीड जिल्ह्यात येणार्‍या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रक्रियेसाठीचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आहेत
तसेच दररोज जिल्हयाबाहेर जाऊन येणे आवश्यक आहे अशा व्यक्तींसाठी दैनंदिन प्रवासासाठी ई-पास काढून आणि अॅटिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे

या विलगीकरण प्रक्रियेसाठीच्या निर्देशानुसार
ग्रामीण भागात बाहेरच्या जिल्हयामधून येणारी प्रत्येक व्यक्ती गावाच्या जिल्हा परिषद शाळेत Institutional Quarantine करण्यात येईल. या व्यक्तीसाठी शाळेत पाणी, स्वच्छता इ. या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असेल, जेवणाची व्यवस्था शक्यतोवर त्या व्यक्तीच्या कुटूंबाद्वारेच करण्यातय येईल . गावामध्ये बाहेर जिल्हयातून येणारा प्रत्येक व्यक्ती कोणाच्याही संपर्कात न येता थेट या Institutional Quarantine केंद्रामध्ये जाईल याची खात्री गावचे
सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामदक्षता समिती यांनी करावयाची आहे.

शहरी भागातील बाहेरच्या जिल्हयातून येणान्या सर्व व्यक्तींचा Institutional Quarantine व्यवस्था राहील, सदरील व्यक्तींची माहिती घेवून त्यांना शहरात येताच इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता थेट Institutional Quarantine सेंटरवर आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत यांची असणार आहे यासाठी त्यांना वार्ड दक्षता समितीची मदत घेतली जाणार आहे.

जिल्हयामध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व नागरिकांनी खालील केवळ 16 चेक पोस्ट चा वापर करावा. जिल्हयाच्या हद्यीवरील इतर सर्व रस्ते वापरल्या जाणार नाहीत यासाठी ग्रामपंचायत, तहसिलदार व पोलीस निरिक्षक याकडून कार्यवाही करण्यात येईल .

जिल्हयामध्ये प्रवेश करण्यासाठी16 चेक पोस्ट
1.खामगांव पुल ता. गेवराई 2. महार टाकळी ता.गेवराई 3,मातोरी ता.गेवराई 4.मानुर ता. शिरुर 5.दोलाबडगांव ता.आष्टी 6.वाघळूजतांडा ता.आष्टी 7.गंगामसला ता. माजलगांव 8.सादोळा ता.माजलगांव 9. सोताडा ता. पाटोदा 10. सोनपेठ फाटा ता.परळी11.साकतरोड ता. पाटोदा 12.चौसाळा ता. बीड 13.माळेगांव ता.केज 14.यापूर ता. अंबाजोगाई 15.बोरगांव ता. केज 16.देवळा ता.अंबाजोगाई.

ई-पास शिवाय कोणतीही व्यक्ती चेकपोस्टवर जिल्हयाबाहेर जाणार नाहीत किंवा जिल्हयात येणार नाहीत याची खात्री पोलीस विभागाने करावी आणि तसेच जिल्हयामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा ई-पास वरील टोकन नंबर तालुका निहाय नमूद करुन घ्यावा आणि प्रत्येक तासांनी त्या टोकन नंबरची तालुका निहाय यादी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्या केंद्रीय नियंत्रण
कक्षाकडे पाठवावी असे नमूद केले आहे

सर्व चेक पोस्टवरील आलेल्या अशा याद्या वापरुन दर तासाला संबंधित मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांना येणाऱ्या व्यक्तींची स्थानिक पत्यासह आणि फोन नंबरसह ई-पास वरील सर्व माहिती आरोग्य विभागा मार्फत पाठविण्यात येणार आहे , या माहितीच्या आधारे संबंधित मुख्याधिकारी, ग्रामसेवक त्या व्यक्तींना त्वरीत Institutional Quarantine करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे

जिल्हयामध्ये सध्या राहणाऱ्या व्यक्ती ज्या काही कारणास्तव जिल्हयाबाहेर जाऊन येतील त्यांना नेहमीप्रमाणेच 28 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक असेल, परंतु जिल्हयामध्ये प्रवेश केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची अॅटिजेन टेस्ट ( Antigen Test) घेण्यात येईल आणि त्यासाठी त्यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाद्वारे ज्या आरोग्य केंद्रावर बोलावण्यात येईल तेथे नियोजित वेळेत येणे बंधनकारक असेल.

दररोज जिल्हयाबाहेर जाऊन येणे आवश्यक आहे दूध विक्रेते, फळभाजी विक्रेते, खाजगी, शासकीय आस्थापना वरील अधिकारी, कर्मचारी आदी अशा व्यक्तींंनी सुध्दा ई-पास काढूनच प्रवास करणे बंधनकारक असेल परंतु ई-पासचा फॉर्म
भरतांना दैनंदिन प्रवासासाठी ‘ असा उल्लेख असणे बंधनकारक असेल अन्यथा पास रद्य करण्यात येईल. तसेच असा पास धारण
करणान्या व्यक्तींना आठवडयातून एकदा अॅटिजेन टेस्ट (Antigen Test ) साठी नियोजित आरोग्य केंद्रावर बोलाविण्यात येईल आणि नियोजित वेळेत तेथे जाणे बंधनकारक असेल अन्यथा आपला पास रद्द करण्यात येईल.
अशा सर्व व्यक्तींना याप्रमाणे आरोग्य केंद्रावर आणण्यासाठी सर्व मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांचे सह सर्व शासकीय संबंधित विभाग यांनी संपूर्ण सहकार्य करतील.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close