राज्यस्तरीय मौलाना आझाद समाजसेवा पुरस्कार डॉ. ढवळे यांना जाहीर

बीड — सामाजिक कार्यात अमुल्य योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना दैनिक दिव्यवार्ता व सा.कश्मकश यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येत असलेला राज्यस्तरीय”मौलाना आझाद समाजसेवा” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.डॉ. गणेश ढवळे यांनी गोरगरीब,शोषित,वंचित यांच्या अडचणी विविध आंदोलनातुन सोडवण्यासाठी मोठी भूमिका घेतली असून त्यांच्यामुळे अनेकांना दिलासा देखील मिळाला असुन त्यांचे हेच कार्य पाहून दै.दिव्यवार्ता व सा.कश्मकश यांच्या निवड समितीचे प्रमुख मुजतबा अहेमद खान,संपादक मुहम्मद अबुब्कर,डॉ. सय्यद मसिहा,जैलुल्ला खॉन,तल्हा चाऊस,सिराज खान पठाण, समीर सरकार, महंमद काशेफ आदींनी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना जाहीर केला असुन आज दि.१४ जानेवारी शनिवार रोजी दै.दिव्यवार्ताच्या कार्यालयात संपादक मुहंम्मद अबुब्कर,मा.सभापती खुर्शीद आलम आदीच्या उपस्थित सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.पुरस्कार लवकरच दैनिक दिव्यवार्ताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यस्तरीय “मौलाना आझाद समाजसेवा” पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचे विविध माध्यमातून अभिनंदन करण्यात येत आहे.