देश विदेश

भारत बायोटेकची कोरोना लस पाण्याच्या बाटली पेक्षा कमी दरात मिळणार!

हैदराबाद — तेलंगणाचे मंत्री के तारका रामराव यांनी भारत बायोटेक कडून बनवल्या जात असलेल्या पहिल्या कोरोना लसी च्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या संचालक का सोबत चर्चा केली यावेळी भारत बायोटेकचे एमडी कृष्णा एला यांनी कोरोना लस ही पाण्याच्या बाटली पेक्षा स्वस्त दरात देण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे.
यावेळी कृष्णा एला म्हणाले की, आम्हाला लस बनवण्याचा खूप चांगला अनुभव आहे, कोवाक्सिन या लसीबाबत यूएस आणि जागतिक आरोग्य संघटनाही पाठबळ देत आहेत, आम्ही या शत्रूशी मुकाबला करण्यासाठी एकत्र मुकाबला करत आहोत. वॉटर बॉटलपेक्षा कमी किंमतीत कोरोनावरील लस देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितले.कोवाक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये ज्या स्वयंसेवकांना लस देण्यात आली त्यांच्या आरोग्यावर कोणत्याही प्रतिकूल परिणाम झाल्याची तक्रार नाही. डॉक्टरांनी १४ दिवसांपूर्वी डोस दिलेल्या स्वयंसेवकांना आता दुसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. तर कोवाक्सिन लस ही २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यात उपलब्ध होऊ शकेल असा विश्वास भारत बायोटेकने व्यक्त केला आहे.
दरम्यान, जगात कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याच्या बाबतीत रशिया सर्वांच्या पुढे आहे. रशिया ऑक्टोबर महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या लसीकरण कार्यक्रमाला सुरू करणार आहे. ज्या अर्थी रशिया, असा दावा करत आहे, त्या अर्थी त्या कोरोनावरील लस तयार करण्याच्या बाबतीत इंग्लंड, अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले, असेच म्हणावे लागेल. सध्या भारतात दोन कंपन्या कोरोना लसीची चाचणी करत आहेत. यात भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहचल्या आहेत अशी माहिती आयसीएमआरनं दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close