आष्टी पोलिसांनी गांजासह साडेदहा लाखाचा मुद्देमाल केला जप्त

आष्टी — बंद जीप मधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी कोहिनी फाट्यावरील हॉटेल सरपंच समोर पकडलेल्या जीपमध्ये साडेसहा लाखाचा गांजा जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना बंद जीपमधून गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहिती आधारे मौजे कोहिनी येथील हॉटेल समोर स्फोटक वाहतूक करणारी पांढऱ्या रंगाची बंद बॉडीची जीप आढळून आली. पोलिसांनी संशयावरून या जीपची झाडाझडती घेतली असता जीपमध्ये दोन किलो वजनाचे प्लास्टिक मध्ये पॅक बंद केलेले 26 गांजाचे पुडे असलेल्या सहा कॅरीबॅग सापडल्या. या कारवाईत 65.170 कि.ग्रा. वजनाचा सहा लाख 51 हजार 700 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. यावेळी साडेसहा लाखाच्या गांजा सह साडेदहा लाखाचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती सापडला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. विजय देशमुख करत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर अधीक्षक सुनील पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सलीम चाऊस, सहायक निरीक्षक विजय देशमुख नायब तहसीलदार श्रीमती शारदा दळवी, पोलीस नाईक संतोष दराडे, अमोल ढवळे, राहुल तरकसे, सचिन पवल, रियाज पठाण, सचिन कोळेकर, नितीन बहिरवाल यांनी पार पाडली.