क्राईम

कार वआयशर टेम्पोच्या अपघातात भाजपा नेते मोहन जगताप यांच्या पुतण्याचा मृत्यू

माजलगाव — भाजपाचे नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप हे औरंगाबादहून माजलगावला काम आटोपून परत येत असताना गेवराई जवळ झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडली.

माजलगावच्या छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप व त्याचा मित्र आर्यन कंटुले हे काही कामा निमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून क्रेटा गाडीने माजलगावकडे येत असताना गेवराई जवळ शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या चार चाकी वाहन क्र.MH 44, T 5152 वरील विश्वजित याचा ताबा सुटल्याने आयशर टेम्पो ला धडक बसली. यात विश्वजित यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेला मित्र आर्यन कंटुले हा सीट बेल्ट लावलेला असल्याने सुदैवाने बचावला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान घडली. विश्वजीत जगताप यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button