आपला जिल्हा

पुरवठ्यातील रवी ठाणगेंवर कारवाई होणार ?

बीड — पुरवठा विभागात स्वस्त धान्य दुकानदारांचे चलन देण्यासाठी लूट करणार्‍या ठाणगे च्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यामुळे याप्रकरणी लवकरच त्यांच्या विरोधात कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तहसीलदार निळे यांनी देखील या प्रकरणी लक्ष घातले असल्याने काय कारवाई होते याची उत्सुकता लागली आहे.

सध्याच्या महामारीच्या काळात जनतेची गैरसोय होऊ नये. तळागाळातील शेवटच्या घटकातील व्यक्तींच्या मुखात दोन घास जावे या उद्देशाने धान्याची गोदाम खुली केली मात्र याला लागलेल्या घुशी ही व्यवस्थाच पोखरून काढण्याचं काम सध्या करताना दिसून येत आहे. कोविड परिस्थितीमुळे रेशन दुकानदार तहसीलच्या चकरा मारू शकत नाही. या स्थितीचा गैरफायदा घेत ठाणगे याने दलालांमार्फत राशन दुकानदारांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले. चलन देण्यासाठी दलालांमार्फत पैसे उकळण्याचा काम हाती घेतलं.सैन्यात काम करुन देश भक्ती दाखवलेला हा ठाणगे देश वाईट परिस्थितीतून जात असतांना लुटमार करताना व मग्रुरीने वागतांना दिसून येत आहे.रवी ठाणगे पुरवठ्यात बसून स्वस्त धान्य दुकानदारांची चलनासाठी लूट करीत असल्याचे वृत्त ” सह्याद्री माझाने ” प्रसिद्ध केले. त्यानंतर कांही स्वस्त धान्य दुकानदारानी चलनासाठी लूट होत असल्याचे वरिष्ठांच्या कानावर घातल्याने या प्रकरणाला गती मिळाली असून वरिष्ठ अधिकार्‍याने यामध्ये लक्ष घातले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तहसीलदार यांना जिल्हाधिकार्‍यांनी विशेष अधिकार दिल्याने त्या अधिकार्‍याचा वापर तहसीलदार करत ठाणगे च्या मग्रुरीला चाप लावण्याचे काम करणार आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close