ताज्या घडामोडी

वीज हानी कमी करण्यासाठी महावितरणची मोहीम

औरंगाबाद — महावितरणने  सध्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ॲक्शन मोडवर येत  मोहीम हाती घेतली आहे. सध्या महावितरणच्या 3 परिमंडलातील 41 पेक्षा जास्त वाहिन्यांवर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत वीज चोरांविरुद्ध धडक कार्यवाही, नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल बंच केबल्स टाकणे, मल्टी मीटर बॉक्स बसविणे, कॅपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे इत्यादी कामे करण्यात येत  आहेत.जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

     महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंद्वारे विशेष आढावा बैठक घेवून सूचना दिल्या . या बैठकीसाठी औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री सचिन तालेवार, लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे, नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री अनिल डोये, अधिक्षक अभियंता यांची उपस्थिती होती.

      नियमीतपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना चांगली सेवा मिळावी व त्यातून महावितरणची आर्थिक परिस्थिती उंचवावी यासाठी वीजहानी कमी होणे आवश्यक आहे.  विजेचा वापर जास्त असून काही ५० टक्क्यांहून जास्त वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीजहानी कमी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात उघापासून सुरू करण्यात येणार आहे. वीजहानीची कारणे व त्यानुसार उपाययोजना राबिवण्यासाठी वीज वाहिन्यांचे मीटरिंग सुस्थितीत आणणे, स्वयंचलित पद्धतीने घेण्यात आलेले रीडिंग अपलोड करणे, ग्राहकाला ज्या वितरण रोहित्रावरून वीजपुरवठा करण्यात येतो तेच रोहित्र बिलिंग प्रणालीमध्ये आहे किंवा नाही याची खातरजमा करणे आणि योग्य ऊर्जा अंकेक्षण करणे महत्वाचे आहे. विजेची चोरी, अयोग्य मिटरिंग, अनधिकृत वीजपुरवठा किंवा वीज वाहिन्यावर असलेले आकडे, मीटर रीडिंगमधील त्रुटी, गुणक अवयव चुकीचे असणे आणि वीजबिलांमधील समस्या ही कारणे वाणिज्यिक हानी वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.  वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे.   नादुरुस्त मीटर तातडीने बदलण्यात येतील. तसेच मीटर रीडिंग अचूक राहील याची दक्षता घेण्यात येईल. व वीजखांबावर वीज चोरी जास्त असलेल्या भागातील  काही फिडरवर एरियल बंच केबल्स टाकण्यात येणार आहेत.

     तसेच फिडरवर हानी जास्त असण्यासाठी मोठया प्रमाणात शेगडीचा व हिटरचा वापर कारणीभूत आहेत. अशा फिडरवरील शेगडया, हिटर काढणे. रिमोंटचा वापर होत असलेल्या भागात रिमोटच्या चो—या पकडणे,अज्ञात व्यक्तिकडून मिटर टेम्पर केल्याचा शोध घेवून पोलिस यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करणे. वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकी भरावी.   यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे. या मोहीमेसाठी जनतेने सहकार्य करावे.     नागरिकांनी   अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विघुत कायदयानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button