क्राईम
मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

गेवराई — शेतात तुरीचे खळे सुरू असताना 38 वर्षीय महिलेचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी खामगाव येथे घडली.
संगीता शिवाजी पवार असं मृत महिलेचे नाव आहे.शहागड ता.अंबड जि.जालना येथील पवार कुटुंबाचे गेवराई तालुक्यातील खामगाव येथे शेत आहे. बुधवारी शेतात तुरीचे खळे करण्यासाठी शिवाजी पवार, पत्नी संगीता आणि दोन मुलांसह शेतात गेले होते.दरम्यान मळणी यंत्र सुरु असताना धक्का लागल्याने संगीता मळणी यंत्राच्या पंख्याला अडकल्या. काही क्षणातच संगीता यांच्या शरीराचे तुकडे होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा मुलगा अजय शिवाजी पवार याच्या फिर्यादीवरून मळणी यंत्र चालक संदिप भारत उधे रा. खामगाव याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे