ताज्या घडामोडी

पद्म विभूषण जानकिदेवी बजाज पुरस्काराने केजच्या मनिषा घुले सन्मानित

बीड — जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्या बद्दल केज येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्त्या मनीषा मनीषा घुले यांना ‘ जानकीदेवी बजाज पुरस्काराने ‘ गुरुवारी मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, ग्रामीण महिला व्यवसाय व उद्योजकता विकास’ या संदर्भात दिला जाणारा २९ वा ‘जानकिदेवी बजाज पुरस्कार या वर्षी बीड च्या नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या संस्थापक सचिव श्रीमती मनिषा घुले यांना गुरूवारी मुंबई येथील आयएमसी लेडीज विंगच्या कार्यालयात प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन ब्रँड नायका च्या फाऊंडर व सीईओ श्रीमती फाल्गुनी नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे बीड जिल्ह्याच्या सामाजिक कार्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यावेळी मंचावर आयएमसी लेडीज विंग च्या अध्यक्षा श्रीमती रोमा सिंघानिया, राधिका नाथ, प्रमुख पाहुण्या फाल्गुनी नायर , आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी कनोडिया यांनी तर आभार उपाध्यक्षा अमरीता सोमय्या यांनी मानले,
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बजाज इलेक्ट्रिकचे मालक शेखर बजाज, निर्मल बजाज पूजा बजाज, सुश्री अनार शाह,श्रीमती ज्योती दोशी, डॉ.स्मिता दांडेकर, शिला कृपलानी, आशा जोशी, दीपा सोमण, दीपक सतावलेकर, मृणालिनी खेर, श्री प्रदीप शाह श्रीमती रूप शाह व सुश्री सोम्या रॉय आदींची विशेष उपस्थिती होती. विशेष म्हणजे पुरस्कार वितरण दरम्यान बजाज कुटुंबीय, प्रसिद्ध उद्योगपती समूहातील सहकारी, पदाधिकारी तसेच मान्यवर यांची उपस्थती होती

सर्वांच्या सहकार्याशिवाय महिलांचा सर्वांगीण विकास अशक्य- मनीषा घुले

पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर सत्काराला उत्तर देताना नवचेतना ग्रुपच्या प्रमुख मनीषा घुले म्हणाल्या की, समाजातील प्रत्येक घटकाकडून मदतीची गरज आहे तेव्हाच ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास होईल असे सांगत त्यांनी भविष्यात ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणाऱ्या विविध योजनांची त्यांनी मांडणी केली. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. व अशा पुरस्कारांनी सन्मानित केल्याने ग्रामीण महिलांचे, कार्यकर्त्यांचे मनोबल अधिक वाढून ते आणखीन जोमाने,ताकतीने महिला सक्षमीरणासाठी तयार होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला व सर्वांचे विशेष आभार मानले.

या पुरस्कार सोहळ्यासाठी जानकीदेवी बजाज महिला महावि्यालयाच्या मॅनेजमेंट शिकणाऱ्या विद्यार्थिनी तसेच प्रमुख मीडिया समूहाचे प्रमुख व सुरुवातीपासून त्यांच्या सोबत खंबीरपणे साथ देणारे कुटुंबातील सदस्य.संस्थेचे संचालक महादेव जोगदंड, संस्थेचे सीईओ श्री.अनिल लष्कर, महिला कार्यकर्त्या कौशल्या थोरात,निर्मला जाधव,लक्ष्मी बोरा,वंदना कांबळे,रजनी काकडे,शिवाजी केंद्रे ,विजय गोरे व दत्ता घुले आवर्जून उपस्थिती होतें.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button