ताज्या घडामोडी

थकीत वीज बिल न भरणा-या ग्राहकांना न्यायालयीन नोटिसा

औरंगाबाद —  विकलेल्या विजेचे पैसे वसूल होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. थकबाकीसाठी अनेक वेळा सूचना देवूनही दखल न घेणा-या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांना न्यायालयीन नोटिसा  अर्थात रिकव्हरी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

           महावितरणला वीज विकत घेवून ग्राहकांना वीज पुरवठा करावा लागतो.विकलेल्या विजेचे पैसे दरमहा वसूल होत नसल्याने अनेक वेळा नोटिसा, सूचना, एसएमएस करून थकबाकीदार ग्राहकांकडे पाठपुरावा केला जातो. मात्र थकबाकी न भरणा—या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करून  संबंधितांचे मीटर वायर काढून आणले जाते. त्यानंतर सदर ग्राहक वीज बिलाच्या थकबाकीचा भरणा न करता कानाडोळा करत असल्याने महावितरणच्या वीज बिलाचा महसूल थकीत राहून डोगंर वाढतच राहतो.   सदर  ग्राहकांकडे थकीत वीज बिलासाठी पाठपुरावा करूनही दखल न घेणा—या ग्राहकांना महावितरणने वसूलीसाठी रिकव्हरी नोटिसा अर्थात न्यायालयीन नोटिसा दाखल संबंधित क्षेत्रात बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये घरगुती ग्राहक, औघोगिक व इतर ग्राहकांचा समावेश आहे.   अशा नोटिसा  महावितरण शहागंज विभागातील ग्राहकांकडे 26 लाख 12 हजार 809 रूपयांची थकबाकीचा समावेश आहे. संबंधित ग्राहकांनी सदर बिलाचा भरणा न केल्यास त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी वकिलाच्या फिसचा खर्च, मानसिक़त्रास, न्यायालयीन वेळ याचा त्रास सहन करावा लागणार आहे. अशा मराठवाडयात  कायमस्वरूपी खंडित थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button