तुलसी फॅशन एक्जीबिशनचे सुशीलाताई मोराळे यांच्या हस्ते उद्घाटन; चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग

४०० विद्यार्थिनींनी बनवले विविध प्रकारचे ड्रेस, साडी, ज्वेलरी,घर उपयोगी वस्तू ; विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध
बीड — तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड यांच्या वतीने फॅशन एक्झिबिशन चे आयोजन दिनांक ६ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळे मध्ये करण्यात आले आहे.या फॅशन एक्जीबिशनचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तुलसी महिला मंडळाचे अध्यक्ष दिपाताई रोडे, प्रियंका संदीप उपरे, प्रशासकीय अधिकारी अस्मिता साळवे, प्रभारी प्राचार्य विद्या अवघडे यांची उपस्थिती होती.
फॅशन एक्झिबिशन मध्ये विविध प्रकारचे ड्रेस, साडी, ज्वेलरी, घर उपयोगी वस्तू पाहण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत.तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,बीड येथील ४०० विद्यार्थिनींनी सदरील एक्जीबिशन मध्ये आपली कलाकुसर दाखवत विविध वस्तूंना फॅशनेबल पद्धतीने प्रदर्शित केले आहे.
संक्रांतीच्या काळामध्ये महिलांना लागणाऱ्या वस्तू कमी दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सदरील फॅशन एक्जीबिशनचे ठिकाण तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,बीड शासकीय आय टीआय च्या मागे असून फॅशन एक्झिबिशन पाहण्यासाठी महिला व युवतींनी सहकुटुंब यावे तसेच विद्यार्थिनींनी तयार केलेल्या कलाकुसरीला कौतुकाची थाप द्यावी आणि एक्झिबिशनचा लाभ घ्यावा असे आवाहन तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.