औरंगाबाद बीड जालना येथे वीज वितरणासाठी टाटा पॉवर ची तयारी!

बीड — औरंगाबाद बीड जालना येथे वीज वितरणासाठी टाटा पावर ने तयारी सुरू केली असून टोरंट पाॅवर ने नागपूर आणि पुण्यासाठी वीज वितरण प्रणाली सांभाळण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश नियामक आयोगाकडे परवानगी मागितली आहे.
वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हातात सोपवण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 72 तासाचा संप पुकारला होता मात्र उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला होता. सरकार व संघटनेमध्ये खाजगीकरणा संदर्भात चर्चा झाली खाजगीकरण केलं जाणार नसल्याचं सांगितलं गेलं असलं तरी सरकारकडून कुठलीही हमी वीज कर्मचारी संघटनांनी घेतली नाही. त्यामुळे संप मागे घेऊन संघटनांची फजगत झाली आहे.
अदानी पावर च्या वतीने नवी मुंबई पनवेल उरण ठाणे आदी परिसरात समांतर वीज वितरणाचे लायसन्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश नियमक आयोगाकडे अर्ज केला आहे. तसेच भिवंडी- शीळ मुंब्रा-कळवात वीज वितरण फ्रॅंचाईजी संभाळत असलेली कंपनी टोरंट पॉवर ने नागपूर महापालिका क्षेत्र आणि पुणे जिल्ह्याच्या वीज वितरण करण्यासाठी सज्ज असून डिसेंबर 2022 मध्ये इलेक्ट्रिसिटी ॲक्टमधील तरतुदीनुसार महाराष्ट्र प्रदेश नियमक आयोगाकडे लायसन्स साठी अर्ज सादर केला आहे. सुनावणीनंतर समांतर वीज वीज वितरणासाठी सज्ज होतील. यापूर्वी नागपूर शहरातील वीज वितरण व्यवस्था खाजगी कंपनीकडे देण्याचा महावितरण चा प्रयत्न फसला होता. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला होता त्यामुळे नागपूरचा कारभार खाजगी कंपनीच्या हातात दिला तर त्यास विरोध करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने दिला आहे.याचबरोबर टाटा पावर ने देखील आपली तयारी सुरू केली असून औरंगाबाद बीड जालना येथे वीज वितरणासाठी तयारी दर्शविली आहे. या संदर्भातील काही पोस्ट वीज कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमध्ये संप काळात फिरत होत्या. टाटा पॉवर ने नियामक आयोगाकडे परवान्या संदर्भात अर्ज केला असल्याचं सांगितलं जाऊ लागला आहे. टाटा पॉवर ने अर्ज केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी हे वृत्त देखील फेटाळले नाही.