ताज्या घडामोडी

वाळू माफियां सोबत तहसील आवारातच सानप कडून हजारेंच्या हजेरीत तोड पाणी !

बीड — सिंदफणा टूकडमोडी नदीतून सर्रास वाळू उपसा सध्या सुरू आहे. मात्र या वाळू उपशाला तहसीलच्या आवारातूनच मंडळ अधिकारी सानप वाळू माफियांसोबत सेटलमेंट करून खुली सूट देत आहे. राजरोस हप्ते खोरीच तोडपाणी केलं जातं. तहसील मध्ये येणाऱ्यांना हि सौदेबाजी ऐकायला मिळते. कहर म्हणजे यात तहसीलदार हजारे देखील भाग घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नागापूर भाटसांगवी,ब-हाणपपूर,खूंड्रस
कूक्कडगांव, वाकनाथपूर, नाळवंडी,खांडे पारगाव इथून सिंदफणा, टूकडमोडी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे हा वाळू उपसा राजरोस केला जात आहे.तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार ही महसूलची मंडळी सध्या आत्ता गोळा करण्यातच दंग असल्याचं पाहायला मिळत आहे. वाळू उपसा होत असला तरी हप्ताखोरीमुळे तहसीलदार हजारे देखील कारवाई करत नसल्याचं दिसू लागला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाळू माफियांसोबत जी हप्त्याची तोडं पाणी केली जाते ती चक्क तहसील आवारातून होऊ लागली आहे. दररोज सानप नावाचे मंडळ अधिकारी अगदी मोठ्या आवाजात वाळूमाफियांसोबत तहसीलदारांचा हप्ता किती स्वतःचा किती हे सांगत पैशाच्या देवाणघेवाण विषयी बोलत असल्याचं पाहायला मिळू लागला आहे. तहसीलच्या आवारातच पैशाची देखील देवाण-घेवाण होते. आतापर्यंत वसुलीला माणूस नेमलेला असायचा.आता मात्र वाळू माफिया तहसीलमध्ये हप्ता आणून देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पैसा मिळाला की वाळू माफियांना वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिल्या जाते. थोडक्यात बोलायचं तर नदीतील वाळूचा हरासच केला जात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सानप तोडपाणी करत असताना अशावेळी तहसीलदार हजारे देखील उपस्थित असल्याचं तहसील मध्ये येणाऱ्यांना ऐकायला व पाहायला मिळू लागला आहे. दंडाधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीनेच महसूल ची अशी अब्रूची लक्तरं तहसीलच्या वेशीवरच टांगावी याबद्दल जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button