आपला जिल्हा

गुरुवारी तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 738 वर केला असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. गुरुवारी तिघांचा कोरोनामुळे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 30 वर जाऊन पोहोचला आहे.
आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील कोरोना बाधित महिलेवर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. गेवराई येथील 80 वर्षीय व्यक्ती जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता त्यांना दम्याचा आजार होता. त्यांचा पहिला स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला होता. तर बीड येथील 72 वर्षीय व्यक्तीचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता बीड जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 30 झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close