आरोग्य व शिक्षण

‘ कुंभार ‘ विद्यार्थ्यांना योग साधनेद्वारे ‘अजित ‘ बनवणार

    • विद्यार्थ्यांची रोग प्रतिकार शक्ती, शारिरीक व मानसिक स्वास्थ्य यासाठी योग साधना उपयुक्त

जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभागाचा विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

१ ते १४ ऑगस्ट या कालावधीत योगा, प्राणायाम व पोषक आहार यांचे तज्ञाव्दारे मार्गदर्शन फेसबुक लाईव्ह

बीड, — कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूरु असलेल्या लॉकडाऊनमूळे दिनांक 22 मार्च पासुन राज्यात सर्व आस्थापनाच्या शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली राहावी त्यांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे व शरीरातील ताणतणाव निघुन जावा यासाठी योग साधना अत्यंत उपयुक्त आहे सर्व शिक्षक, पालकांनी या उपक्रमात आपल्या विद्यार्थ्यासह सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

    वेळापत्रक
1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट
सकाळी   6.30 ते 7.30
राष्ट्रगीत –  52 सेकंद,
योगा- 20 मिनिट,
प्राणायाम,-    20 मिनिट,
योगशिक्षक —   विकास गवते,
सहशिक्षक, हेमंत बडवे, सहशिक्षक
सकस आहार मार्गदर्शन—
10 मिनिट-डॉ.सावित्री कचरे, NRC आहारतज्ञ, शासकीय जिल्हा रुग्णालय बीड.

स्कुल फ्रॉम होम उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन सुरु राहावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थी, पालक व सर्वसामान्य नागरिक यांचे आरोग्य उत्तम ठेवणे व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी योग साधन अत्यंत उपयुक्त आहे असे आरोग्य व शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासा सोबतच त्यांची शारिरीक व मानसिक क्षमतांचाही विकास होणे महत्वाचे आहे. यासोबतच कोव्हिड 19 या साथरोगामुळे उद्भवलेल्या एकंदर परिस्थितीत ताणतणाव दुर करणे व निरोगी राहाणे आवश्यक आहे म्हणुनच दिनांक 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2020 या कालावधीत दररोज सकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व नागरिक यांच्या साठी योगा, प्राणायाम व पोषक आहार यांचे तज्ञाव्दारे मार्गदर्शन फेसबुक लाईव्हचे माध्यमातुन करण्यात येणार आहे.

सदरील उपक्रम शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड या फेसबुक पेजवर वरील वेळेत लाईव्ह केला जाणार आहे. सकाळी 6.30 वा राष्ट्रगीताने योगसत्राची सुरुवात होईल त्यानंतर 10 मिनिटे वॉर्मअप व सूर्यनमस्कार केला जाईल. यानंतर 25 ते 30 मिनिट योगा व प्राणायाम केला जाणार आहे. तर योग शिबीरा दरम्यान ठराविक सत्रात कोरोना काळातील आहार या विषयावर आहार तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे या उपक्रमामुळे आपल्या सर्वांची प्रतिकार क्षमता वाढणार आहे.

शारिरीक सुदृढतेस मदत होणार आहे. तरी जिल्हयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी नियमित सहभागी होऊन कोरोना लढाईत सहभाग नोंदवावा असे शिक्षणाधिकारी (प्रा) अजय बहिर यांनी कळविले आहे.

सदरील उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शकाच्या सुचनेनुसार सहभाग घ्यावा तसेच नियोजित वेळेला उपाशी पोटी सैलसर कपडे परिधान करुन चटई अथवा बस्कर पट्टीचा आसनासाठी वापर करावा.

विदयार्थ्यांनी योगाभ्यास आपपल्या घरी व पालकांच्या उपस्थितीतच करावयाचा आहे तसेच एखादे आसन अथवा क्रिया विद्यार्थी/ पालकांस अवघड वाटत असेल अथवा त्रास होत असेल तर ती टाळावी असे नमूद केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close