आपला जिल्हा

पूरवठा विभागात खाजगी लोकांची ढवळा ढवळ कोणाच्या आशिर्वादाने ? जिल्हाधिकार्‍यांनी  कारवाई करण्याची मागणी

बीड — स्वस्त धान्य दुकानदारांना धान्यासाठी चलन भरुन घेतले जातात. ते व्यक्तीक दुकानदारांच्या हातात दिले पाहिजेत मात्र तसं न करता या ठिकाणचे कर्मचारी ते अधिकार स्वत:कडे ठेवून दलालामार्फत प्रति दुकानदार ३०० रुपये या प्रमाणे वसुल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

या वसुलीसाठी बीडमध्ये सरकारी कार्यालयाशी कुठलाही संबंध नसताना इकबाल नावाचा व्यक्ती तर नेकनूर येथील पठाण तर चौसाळा विभागातील मसेवाडी येथील स्वस्त धान्य दुकान यांच्यामार्फत सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांकडून बेकायदेशीर वसुली केली जात आहे. अशी माहिती अनेक स्वस्त धान्य दुकानदारंनी दिली आहे. याबाबीकडे जिल्हाधिकार्‍याने लक्ष देवून संबंधीत कर्मचार्‍यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी समोर येत आहे. पुरवठा विभागामध्ये रवि ठाणगे हे सैन्यामध्ये सैनिक होते.त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना महसुलात काम करण्याची चांगली संधी मिळाली. मात्र ते या प्रकरणात आहेत का? याची माहिती घेवून कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा पुरवठा विभागात होणारी स्वस्त धान्य दुकानदारांची पिळवणुक थांबणारच नाही. अनेक स्वस्त धान्य दुकानदार दबावापोटी तक्रार करत नाहीत. मात्र अनेक दुकानदारांनी या प्रकरणाची थेट जिल्हाधिकार्‍याकडेच तक्रार करणार असल्याचे बोलून दाखवले. चौसाळा, नेकनूर, पिंपळनेर या ठिकाणी खासगी एजंट नेमून त्यांच्या मार्फत वसुली केली जात असल्याचे समजते. एखाद्या पत्रकाराने जिल्हाधिकार्‍याला फोन जर केला तर जिल्हाधिकारी अतिषय चांगला संवाद पत्रकाराशी करतात मात्र या ठिकाणचे कर्मचारी रवि ठाणगे हे पत्रकारांना अरेरावीची भाषा वापरुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येकालाच सांगतात मी सैन्यात होतो अनेक वर्ष देशसेवा केली आहे. त्यामुळे मला त्या महसुलाच्या नौकरीचे काही वाटत नाही अशी उद्धड भाषा पत्रकारांना केली जाते.आजपर्यंत पुरवठा विभागामध्ये पत्रकारांना कोणतेच कर्मचारी अरेरावी किंवा उद्धट सारखे बोलत नाहीत. फोन ठेवा म्हणत नाही. काम असेल तरच फोन करा अन्यथा फोन ठेवा अशी भाषा पत्रकारांना वापरली जाते. लॉकडाऊनच्या काळामध्ये शासनाचा अतिरिक्त धान्य पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला. त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना दबावात घेवून बरेच काळे कारणाने झाल्याचे समोर येत आहे. प्रशासनात होणार्‍या अनागोंधी कारभारावर प्रकाश टाकणं ही वृत्तपत्राची नैतिक जबाबदारी आहे. कोनी उद्धटसारखा बोलला तरी याचा पाठपुरावा करणे बंद होणार नाही. या प्रकरणाची प्रसिद्धी करुन जिल्हाधिकार्‍याला या प्रकरणी कारवाई करण्यास विनंती करण्यात येईल. इकबाल याचा तहसील पुरवठा विभागात मोठा हस्तक्षेप कोणाच्या सांगण्यावरुन आहे. पिवळी शिधापत्रीका देण्यासाठी २००० हजार रुपये तर केशरी शिधापत्रीकेसाठी १००० हजार रुपये घेतले जातात. या खासगी लोकाकडून ही कामे करुन घेणारा कोण कर्मचारी आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. तरच सर्व सामान्य ग्राहकांना कार्ड मिळण्यासाठी होणारी लूट थांबली जाईल. मात्र इकबाल पठाण अन्य एका एजंटची चौकशी होवून ते कोणाच्या मार्गर्शनाखाली काम करतात याची चौकशी होवून संबंधीतावर गुन्हे दाखल करुन त्या कर्मचार्‍याला निलंबीत करण्यात यावे अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदाराकडून होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close