क्राईम

डॉक्टरचा महिलेवर अनैसर्गिक अत्याचार; गुन्हा दाखल

परळी — डॉक्टरने 29 वर्षीय पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करीत अत्याचार केला तसेच मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना धर्मापुरी येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉक्टर व त्याच्या 7 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे बी.एच.एम.एस शिक्षण घेतलेली व्यक्ती खाजगी प्रॅक्टिस करीत आहे. या व्यक्तीने 29 वर्षीय पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत,मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. तसेच या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ देखील केला शेवटी.पीडित महिलेने सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली दरम्यान या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीसात गुरनं 313 / 2022 कलम 377, 498 अ, 323, 504,34 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी डॉक्टर व त्यांचे 7 नातेवाईक फरार झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि खोडेवाड हे करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button