तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीडच्या वतीने राज्यस्तरीय ड्रेस डिझाईयनिंग स्पर्धेचे आयोजन

सावित्रीमाई फुले व माँसाहेब जिजाऊ जयंती महोत्सव २०२३
बीड — सावित्रीबाई फुले व माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये राज्यस्तरीय ड्रेस डिझायनिंग स्पर्धेचे आयोजन तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड यांच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी दिली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धे मध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले कलागुण सादर करावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दि.३ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार असून या रॅलीचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे होणार आहे.
दि.४ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता ड्रेस डिझाईनिंग स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
यानंतर पारंपारिक ड्रेस डिझाईनिंग स्पर्धला सुरुवात होणार आहे.यामध्ये ड्रेस हा ८,१०,१२ साईजच्या डमीवर प्रदर्शित केला जाईल या स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क २५० रुपये आहे.
दि.५ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता इन्स्टॉलेशन स्पर्धा होणार आहे यामध्ये टाकाऊ पासून टिकाऊ या थीमवर रुंदी ३ फूट उंची ८ फूट वर स्पर्धकांनी आपले कलागुण सादर करावेत.या स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क २५० रुपये आहे.
दि.६,७,८ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत फॅशन एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील एक्झिबिशन पाहण्यासाठी मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असेल यामध्ये विद्यार्थिनींनी तयार केलेले विविध प्रकारचे ड्रेस,साडी,ज्वेलरी तसेच विविध प्रकारच्या फॅशन डिझायनिंग वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
दि.९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या अखंड काव्यावर आधारित विशेष संगीत मैफल स्वर फुलोरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ.संजय मोहड,प्रोपेसर व संगीत विभाग प्रमुख स.भू.कला व वाणिज्य महाविद्यालय आणि सहकारी कलावंत औरंगाबाद यांची उपस्थिती असणार आहे.
दि.१२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी कार्यक्रमाची सांगता आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी दिली आहे.