आरोग्य व शिक्षण

सावधान ! कोरोनावर मात केलेल्या 80 टक्के लोकांना होतो हृदयाचा आजार

नवी दिल्ली— जगभरात कोरोनावर संशोधन करण्यात येत आहे. नव्या रिसर्चमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून चिंता वाढवली आहे. देशात तब्बल दहा लाख तर जगात एक कोटी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लढाई जिंकली आहे.उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आता कोरोनावर मात केलेल्या जवळपास 80% रुग्णांना हृदयाचा आजार होत असल्याची चिंताजनक माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे.
जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने याबाबतचा रिसर्च केला आहे. यामध्ये यावर्षी एप्रिल ते जून 2020 दरम्यान कोरोनातून बरे झालेल्या, मात केलेल्या 100 लोकांचा अभ्यास करण्यात आला. रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की 100 पैकी 78 रुग्णांना हृदयाच्या अनेक समस्या होत्या. 60 लोकांच्या हृदयाला सूज दिसून आली आहे. संशोधकांच्या मते सुरुवातीला अशा गंभीर समस्या रुग्णांना नव्हत्या, त्यांच्या अशी कोणतीही लक्षणं आधी आढळली नव्हती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close