ताज्या घडामोडी

बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी नीता अंधारे

बीड — नगर पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांची बदली करण्याचे आदेश शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी 29 डिसेंबर रोजी जारी केले आहेत. आता बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी बीड जिल्हा प्रशासन अधिकारी नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दुपारी नीता अंधारे यांनी मुख्याधिकारी म्हणून पदभार स्विकारला.नीता अंधारे यांच्या रूपाने बीड नगरपालिकेला पहिल्या महिला मुख्याधिकारी लाभल्या आहेत.

मुख्याधिकारी या गट ब संवर्गातील अधिकारी उमेश ढाकणे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान ढाकणे यांना कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमीत करण्यात येणार असल्याचे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी निता अंधारे यांच्याकडे बीड न.प.चे मुख्याधिकारीपद सोपविण्यात आले आहे.

पूर्वी मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी गेवराई न.प.चे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले होते. बदली आदेश जारी झाल्यानंतर नीता अंधारे यांनी पदभार स्वीकारला नीता अंधारे या पहिल्या महिला मुख्याधिकारी म्हणून बीड न.प ला लाभल्या आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button