हिंगणीच्या सरपंच पदी सौ कमलताई वायसे तर उपसरपंच पदी अंकुश गोरे

बीड — तालुक्यातील हिंगणी बु.ग्रामपंचायत वर सलग चौथ्यांदा अॅड. चंद्रकांत गोरे यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. सरपंच पदी सौ कमलताई सखाराम वायसे विजयी झाल्या तर उपसरपंच पदी अंकुश बापूराव गोरे यांची आज एकमताने निवड करण्यात आली.
एड. चंद्रकांत गोरे यांचे समर्थक असलेले सौ अर्चना स्वप्निल चव्हाण,सौ. अर्चना स्वप्नील चव्हाण सौ. सविता अंकुश नाईकवाडे सौ. प्रियांका सयाजी जाधव सौ कविता राजेंद्र वायसे. बाबासाहेब गणपती बोराडे .शहाजी बाबुराव सुरवसे यांच्यासह अंकुश बापूराव गोरे यांची ग्रामपंचायत च्या सदस्य पदी बिनविरोध निवड झाली.
मात्र सरपंच पदासाठी सौ कमल ताई सखाराम वायसे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय होऊन त्या सरपंच पदी निवडल्या गेल्या.आज उपसरपंच पदासाठी अंकुश बापूराव गोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच सौ अमरजा अंकुश गोरे यांनी सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी हिंगणीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.