आरोग्य व शिक्षण

जे भल्या भल्यांना जमलं नाही,ते दहावीच्या परीक्षेत पठ्ठ्याने करून दाखवलं. सर्वच विषयात 35 गुण मिळवून धनंजयनं लक्ष वेधलं

बीड — राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत धनंजय नारायण नखाते या विद्यार्थ्याने अनोखा विक्रम नोंदवला आहे. या पठ्ठ्याने मॅजिक आकडा गाठत चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याने 6 विषयात प्रत्येक 35 गुण मिळवून आश्चर्याचा धक्का दिला आहे.

आज दुपारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी गुणवंत विद्यार्थीच राहतो. राज्यातून जिल्ह्यातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटवणारा विद्यार्थी कौतुकास पात्र ठरतो. मात्र कमी गुण मिळवूनही चर्चेच्या केंद्रस्थानी माजलगाव तालुक्यातील उमरी येथील रामेश्वर विद्यालयातील विद्यार्थी आला आहे. या विद्यार्थ्याने मिळवलेल्या जादुई आकड्यांनी सर्वांच्या भुवया उंचवायला भाग पाडले आहे. उमरी च्या या विद्यार्थ्याने सर्व सहा विषयात प्रत्येकी 35 गुण मिळवत यश संपादन केले आहे. हा अनोखा विक्रम प्रस्थापित केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे धनंजय नारायण नखाते. धनंजयला 500 गुणांपैकी 175 गुण मिळाले आहेत. ज्यावेळी त्याचा निकाल हाती पडला त्यावेळी त्याचा हा जादुई आकडा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close