देश विदेश

बाहेर फिरताना मास्क घातला नाही, पोलिसांनी बकरीला केली अटक

कानपूर —  सध्या देशात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता
लोकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास, दंडात्मक कारवाईही केली जात आहे. मात्र मास्क न घातल्या प्रकरणी पोलिसांनी चक्क बकरीला अटक केल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली
कानपूर मधील बेकनगंज भागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना अचानक रस्त्यात एक बकरी आढळली. मास्क न घालता ही बकरी फिरत असल्यामुळे पोलिस या बकरीला जीपमध्ये बसवून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.जेव्हा बकरीच्या मालकाला या घटनेबाबत कळले, तेव्हा तो बकरीला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचला. अनेक विनवण्या केल्यानंतर अखेर पोलिसांनी बकरीला मालकाच्या ताब्यात दिले. मात्र पुन्हा रस्त्यावर प्राणी फिरता कामा नये, अशी सक्त ताकीदही दिली. दरम्यान, हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर लोकांनी पोलिसांची मस्करी करण्यात सुरुवात केली. त्यावेळी खरा प्रकार समोर आला. IANSने दिलेल्या माहितीनुसार अनवारगंज पोलीस स्टेशनचे अधिकारी शैफुद्दीन बेग यांनी सांगितले की, त्यांनी एका तरुणाला पाहिलं, जो मास्क न घालता बकरीला फिरवत होता. पोलिसांना पाहिल्यानंतर तो तरुण पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी जीपमधून बकरीला पोलीस स्टेशनमध्ये आणले.
तर, दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यानं, जर लोकं श्नानाला मास्क घालत आहे तर मग बकरीला का नाही? असा सवाल केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणाची आणि पोलिसांची सध्या मस्करी केली जात आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close