क्राईम

बीडच्या एसीबीची औरंगाबादेत कारवाई, तीस हजाराची लाच घेताना पुरावा नष्ट करण्याचा पी आयचा प्रयत्न

बीड — वाळू वाहतूकीसाठी लोकेशन देणार्‍या मुलांवर कारवाई न करण्यासाठी तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलीस निरीक्षक सय्यद शौकत याने केली. ही लाच मागितल्या प्रकरणी बीडच्या लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षकावर कारवाई केली ही कारवाई मंगळवार दि.28 जुलै रोजी औरंगाबाद येथील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.

तक्रारदार हे 407 टेम्पोने वाळू वाहतूक करतात. त्यासाठी पोलिसांचे लोकेशन देणाऱ्या मुलावर सीआरपीसी 109 प्रमाणे कारवाई करण्यासाठी शिलेगाव पोलीस स्टेशन औरंगाबाद चे पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली यांनी हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. मात्र लाच स्वीकारताना तक्रारदाराचा संशय आल्यानंतर या पोलिस अधिकाऱ्यांने तक्रारदाराच्या जवळ असलेल्या व्हॉइस रेकॉर्डर हिसकावून घेत त्यामधील संभाषण नष्ट करण्याच्या उद्देशाने यामध्ये असलेली मेमरी काढून घेत ओरखडे ओढून मेमरी कार्ड निकामी केले. सरकारी मालमत्ता नष्ट करण्याचा प्रयत्न केला याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोनि.राजकुमार सायसिंग पाडवी, पोना.हनुमान गोरे, राजेश नेहरकर, पोशि.मनोज गदळे, प्रदीप वीर, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close