आपला जिल्हा

बीड ,तब्बल 37 कोरोना पॉझिटिव चौसाळा ,नेकनूर मध्ये सापडले रुग्ण

बीड — कोरोना ने जिल्ह्याला घातलेला विळखा आणखी घट्ट होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. 28 जुलै रोजी सुद्धा तब्बल 37 रुग्ण जिल्ह्यात सापडले आहे. त्यापैकी 21 बीड तालुक्यात परळीत 5, अंबाजोगाईत आठ तर गेवराईत दोन रुग्ण सापडले आहेत. बीड शहरात सापडलेले तब्बल दहा रुग्ण हे कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या सहवासात आल्यामुळे बाधित झाले आहेत. चौसाळा व नेकनुर येथे देखील रुग्ण आढळले आहेत

बीड–21
शहरातील भीमराज गल्ली, राजुरी वेस याठिकाणी 25 वर्षीय युवक बलभीम चौक टिळक रोड येथे दहा वर्षाची मुलगी, 38 वर्षांचा पुरुष, शनी मंदिर गल्ली चार वर्षाची मुलगी साठ वर्षाचा वृद्ध तसेच 28 वर्षीय महिला बाधित आढळली आहे‌. माऊली चौक, करीमपूरा या ठिकाणी 30 वर्षे महिला काळा हनुमान ठाणा भागात चाळीस वर्षे पुरुष बाधित सापडला आहे. जुना बाजार कमवाडा गल्लीत 56 वर्षे पुरुष, करीमपुरा माऊली चौक येथे 38 वर्षे पुरुष, पंधरा वर्षाचा मुलगा, जुन्या एस पी ऑफीस जवळ गणेश नगर येथे 32 वर्षे पुरुष,काळा हनुमान ठाणा खंडेश्वरी रोड चांदणी वस्ती येथे 21 वर्षे पुरुष, पालवण चौक येथे 25 वर्षीय पुरुष, राणू माता मंदिराच्या मागे शाहूनगर येथे अठरा वर्षाचा मुलगा तसेच पिंपरगव्हाण रोड माऊली नगर येथे 49 वर्षीय महिला संक्रमित आढळली आहे.
तर बीड तालुक्यातील नेकनूर मध्ये एम एम कॉम्प्लेक्समध्ये राहणारी 24 वर्षीय महिला 48 वर्षीय पुरुष व पंचवीस वर्षाचा युवक संक्रमित झाला आहे. घोडका राजुरी येथे 60 वर्षीय महिला, चौसाळा येथे 55 वर्षीय पुरुष देखील बाधित झालेला आहे.
परळी — 5
परळी शहरातील टीपीएस कॉलनी येथे 26 वर्षे पुरुष व पंचवीस वर्ष पुरुष पंचशील नगर मध्ये सापडला आहे संभाजीनगर पोलीस स्टेशनचा कर्मचारी देखील कोरोना बाधित रुग्णाच्या सहवासात आल्यामुळे संक्रमित झाला आहे. तालुक्यातील धर्मापुरी येथे 65 वर्षीय पुरुष टोकवाडी येथे सतरा वर्षाचा मुलगा संक्रमित आढळला आहे.
अंबाजोगाई–8
शहराचा पडलेल्या आठ रुग्णांपैकी सात रुग्ण संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झालेले आहेत. आंबेडकर चौकाजवळ 32 वर्षे पुरुष हाउसिंग सोसायटी येथे 42 वर्षे पुरुष हनुमान मळा जोगाई वाडी येथे सोळा वर्षाची मुलगी 18 वर्षाचा युवक, अनुराग कॉलनी येथे बत्तीस वर्षाचा पुरुष व 49 वर्षीय महिला 26 वर्षे युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर झारे गल्लीत येथे 22 वर्षाचा युवक बाधित आढळला आहे.
गेवराई — 2
शहरातील ताकडगाव रोड वरील सरस्वती कॉलनी येथे संक्रमित रुग्णाच्या सहवासात आल्यामुळे 40 वर्षीय पुरुष व निकम गल्ली येथे 75 वर्षीय वृद्धाचा देखील समावेश आहे
आष्टी — 1
तालुक्यातील लोणी सय्यद मीर येथे सत्तर वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळली आहे. या रुग्णावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close