बीड जिल्हा हादरला ! 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

गेवराई — शहरातील बस स्थानक परिसरात फळ विक्री करणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी पहाटे तीन च्या सुमारास घडली दरम्यान आरोपीने महिलेला मारहाण केली असल्याने ती गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे
औरंगाबाद बीड मुख्य रस्त्यावर ही 70 वर्षीय वृद्ध महिला फळ विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करते. रस्त्याच्या आडबाजूलाच ती राहाते. याच संधीचा फायदा घेत गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास नराधमाने वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच आरोपीने पीडीत वृद्धेला मारहाण देखील केली. घटना घडल्यानंतर पीडितेने आरडा ओरडा केल्यानंतर नागरिकांनी धाव घेतली मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाला.या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर अवस्थेतील जखमी पीडित महिलेला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेज वरून आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी तात्काळ ज्ञानेश्वर लक्ष्मण घुंगार्डे वय 31वर्ष, घुंगार्डे गल्ली, गेवराई यास ताब्यात घेतले. याप्रकरणी गेवराई पोलिसात ज्ञानेश्वर घुंगार्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र हादरला आहे.