क्राईम
कारेगव्हाणमध्ये 40 वर्षीय महिलेवर बलात्कार

नेकनूर — चाळीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगव्हाण येथे मंगळवारी घडली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
विकास श्रीरंग खंदारे असं
आरोपीचे नाव आहे. मंगळवारी आरोपीने पीडित महिलेला ज्वारीच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच घडलेली घटना कोणालाही सांगू नको अन्यथा जीवे मारण्यात येईल अशी धमकी देखील त्याने पिडीतेला दिली याप्रकरणी पिडित महिलेने रात्री नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी खंदारे याच्याविरोधात कलम 376, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथकप्रमुख मिसळे हे करत आहेत.