आपला जिल्हा

बीडमधील तालुका स्टेडियमचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण

          • लवकरच पुढचे कामही सुरू होणार-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर

बीड — शहरातील खंडेश्वरी देवी मंदिर समोरील बीड तालुका स्टेडियम येथे आज नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी भेट देऊन परिसराची पहाणी केली.या स्टेडियमचे काम मा.मंञी जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांच्या माध्यमातून मंजुर झालेले असुन याचे पहिल्या टप्प्यातील काम ही झालेले आहे.दुसऱ्या टप्याचा निधी उपलब्ध झाला असुन याचेही काम लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी त्यांनी क्रिडा अधिकारी यांना तात्काळ फोनवरून केल्यानंतर अधिकाऱ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसांत काम सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले असून पुढेच काम लवकरच सुरू होईल अशी माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे

8 ते 10 वर्षापूर्वी हे स्टेडियम मंजुर करण्यासाठी शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध नव्हती नंतर ही जागा उपलब्ध झाली माञ ती यांञिकी विभागाकडे होती यासाठी आण्णांच्या माध्यमातून प्रयत्न करुन ही 8 एक्करची जागा क्रिडाविभागाकडे हस्तांतरित करुन घेतली व नंतर सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला.यासाठी तात्कालिन क्रिडा सचिव सुनिल केंद्रेकर यांनी चांगली मदत यावेळी केल्याचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी सांगितले.9 महिन्यापूर्वीच याचा दुसऱ्या टप्यातील निधी मंजुर झालेला आहे.त्यामुळे आज हे अत्यंत चांगले स्टेडियम या परिसरात होत आहे. बँटमिंटन हॉल,जीम,कार्यालय,स्वच्छतागृह याचा समावेश या टप्यात आहे उर्वरित टप्यातही अनेक कामे यात होणार* असुन काही मागण्या ही यावेळी क्रिडा अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
यावेळी माजी.उपनगराध्यक्ष अमृत (काका) सारडा,नगरसेवक विकास जोगदंड,राणा चव्हाण,संतोष चरखा,शामसुंदर,पारीख,विष्णूदास बियाणी,संजय महाद्वार,विशाल मोरे उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close