महाराष्ट्र

एकनाथ शिंदे साहेब,भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ट्रेसरच्या बदलीत विशेष बाब कसली ?

-- अँड. अजित देशमुख

बीड — भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली “विशेष बाब” म्हणून बीडला करण्याचा आदेश, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी, बीड यांना दिला आहे. ज्या ट्रेसरवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, ज्याच्या चौकशा चालू आहेत, मोठे आरोप आहेत, अशांना विशेष बाब लागू होत असेल, तर तुमची “विशेष बाब” या शब्दाची व्याख्या काय ? असा प्रश्नही आपण मंत्री शिंदे यांना विचारला असल्याची माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी आपण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना यातील माहितीही दिली आहे. त्यामुळे मंत्र्याची विशेष बाब इथं लागू होणार नाही, असेही अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

बीड नगर परिषद मधील ट्रेसर सलीम यांच्यावर भष्ट कामाचे अनेक आरोप आहेत. त्यामुळे त्यांची बदली जिल्ह्याबाहेर झाली होती. पुन्हा त्यांना पाटोद्याला आणले. आता त्यांना पुन्हा बीडला आणण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. काही लोक प्रतिनिधी त्यांना पुन्हा बीडला आणण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहेत.

जनहिताच्या बाबी हाताळण्या ऐवजी जर असे मुद्दे हाताळले जात असतील, तर ते चुकीचे ठरेल. अनेक जण स्वतः तक्रारी करून पुन्हा त्या माघारी का घेतात ? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तर अशा वेळी जनता सर्व राजकारणी एकाच माळेचे मनी आहेत का ? असाही प्रश्न उपस्थित करते.

ही बाब आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या काणी घातली आहे. भ्रष्ट लोक असे सांभाळणे योग्य नाही. असे होत गेले तर घोटाळ्याच्या चौकशीचे कागदपत्र आणि त्या फाईल धोक्यात येतील. त्यामुळे ही विशेष बाब होऊ शकत नाही. त्यामुळे ही बदली करू नये, अशी मागणीही अँड. देशमुख यांनी केली आहे.तसेच राज्याचे मुख्य सचिव यांनाही याबाबत अवगत करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close