क्राईम

नारेवाडीच्या सरपंचाच पोरगं लाच घेताना पकडलं

बीड — मनरेगांतर्गत मंजूर झालेल्या जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेचा चेक तयार झाला. त्यावर सरपंच असलेल्या आईची स्वाक्षरी व ग्रामसेवकास देण्यासाठी असे 20 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सरपंच पुत्रावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी कारवाई केली आहे.

सुधाकर नंदू उगलमुगले वय 34 वर्ष,व्यवसाय शेती रा. नारेवाडी ता. केज जी. बीड असे सरपंचाच्या मुलाचे नाव आहे. तक्रारदाराच्या मुलाच्या नावे मनरेगा अंतर्गत मंजूर जलसिंचन विहिरीचे कुशल कामगाराचे अनुदानाचा चेक आला होता. या चेकवर सुधाकर उगलमुगले याने सरपंच असलेली आपली आई श्रीमती आशाबाई नंदू उगलमुगले यांची सही घेऊन देतो तसेच ग्रामसेवकास देखील पैसे द्यावे लागतील असं म्हणत वीस हजार रुपयाची तक्रारदाराकडे मागणी केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने वीस हजार रुपयाची लाच घेताना सुधाकर उगलमुगले यास रंगेहात पकडले. दरम्यान ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली. याप्रकरणी सरपंच पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button