चौसाळ्याच्या डीसीसी बँकेकडून म. ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक

बीड — महाराष्ट्र शासनाने नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी “महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत ५० हजार रूपये अनुदान खात्यावर जमा करण्यात येते मात्र बँकेतील आधिकारी यांनी संगनमतानेच परस्पर पैसे उचलुन शेतक-यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व संबधित शेतक-यांनी जिल्हाधिकारी बीड,पोलीस अधीक्षक बीड यांना केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखा ता.जि.बीड या बँकेतील मौजे. गोलंग्री ता.जि.बीड येथील खातेदार शिवाजी प्रल्हाद कवडे,लक्ष्मण प्रल्हाद कवडे,बाळु दगडु पवार,वृंदावणी बाबासाहेब कदम,सुरेश बारीकराव कवडे यांच्या खात्यातमधुन महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत खात्यावर ५० हजार रूपये जमा झाल्याचे मोबाईल वर मेसेज आले होते. परंतु यांच्या खात्यावरून परस्पर प्रत्येकी २५ हजार रूपये अनुदान अज्ञात व्यक्तिने उचलल्याचे उघडकीस आले असून याविषयी बॅकेत विचारणा केल्यावर मॅनेजर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर आज लेखी तक्रार करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेमध्ये अनागोंदी कारभार असुन याबद्दल शेतक-यांच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी असुन अशा प्रकारचा अपहार अनेक गावांत घडला असण्याची शक्यता असुन त्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आम्ही लेखी निवेदनाद्वारे केली आहे. असं सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी म्हटलं आहे.