क्राईम

पत्नीच्या खूनप्रकरणी शिक्षा भोगत असलेला व पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची आत्महत्या

गेवराई — एक महिन्याच्या पॅरोलवर असलेल्या एका कैद्याने आज दुपारी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील जातेगाव गावखोर तांडा येथे घडली. हा आरोपी पत्नीचा खून केल्याप्रकरणी औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये शिक्षा भोगत होता.

दोन दिवसात त्याला जेलमध्ये हजर व्हायचे होते त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. भरत ताराचंद पवार ( रा. जातेगाव गावखोर तांडा. वय 26 वर्षे) याने आपल्या पत्नीचा खून केलेला आहे. या प्रकरणी त्याला शिक्षा झाल्याने त्यास हार्सुल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तो एक महिन्यापूर्वी पॅरोलच्या सुट्टीवर आला होता. ही सुट्टी एक महिन्याची होती. त्याची मुदत दोन दिवसाने संपत असल्याने त्याला जेलमध्ये हजर व्हायचे होते मात्र त्याने आज दुपारी कॅनॉल शेजारी असलेल्या एका उंबराच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी तलवाडा पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. ठाण्याचे पीआय उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार खाडे हे पुढील तपास करत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close