प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या सेवा गौरव समारंभास उपस्थित रहा– प्रा.डॉ. विलास भिलारे

चौसाळा — सौ केशरबाई सोनाजीराव शिरसागर उर्फ काकू महाविद्यालयाच्या प्राचार्य सुप्रसिद्ध लेखिका डॉ दीपाताई भारतभूषण क्षीरसागर या 31 डिसेंबर 2022 रोजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत त्यांच्या सेवेचा यथोचित सन्मान आणि गौरव व्हावा या उद्देशाने दिनांक 27 डिसेंबर मंगळवार व 22 डिसेंबर बुधवार 2022 रोजी सेवा गौरव समारंभ व साहित्य महोत्सवाचे आयोजन बीड येथे सौ के एस के महाविद्यालयाच्या प्रणांगणात करण्यात आले असून या कार्यक्रमाला बीड शहरातील व जिल्ह्यातील आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व मराठवाड्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षण प्रेमी जनतेने व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आव्हान असे आवाहन कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथील उपप्राचार्य व सेवा गौरव समितीचे सदस्य डॉ विलास भिलारे यांनी केले आहे.
आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिने अभिनेता मकरंद अनासपुरे व सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे आणि लोकनेते माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर व नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉभारतभूषण क्षीरसागर बीड शहराचे नगरसेवक युवा नेते डॉ योगेश भैया क्षीरसागर डॉक्टर डॉ सारिका ताई क्षीरसागर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या साहित्य महोत्सवामध्ये नामांकित कवीचे कवी संमेलन विविध विषयावर परिसंवाद नाट्य अभिवाचन आणि विविध विषयावर व्याख्याने व चर्चासत्र आणि विविध संस्कृती क कार्यक्रमाचे आयोजन केले असून बीड शहरातील कलाप्रेमी नाट्यप्रेमी रसिकाने या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घ्यावा. या कार्यक्रमाला सिने नाटककार अरविंद जगताप ,अरुंधती पाटील, डॉ .दासू वैद्य श्री दगडू लोमटे बलभीम महाविद्यालया चउपप्राचार्य डॉ विद्या सागर पाटणकर डॉ दीपक नागरगोजे व जेष्ठ नाटकात नरहर कुरुंदकर श्री भारत आण्णा लोळगे इत्यादी नामांकित मान्यवर उपस्थित राहणार असून सेवा गौरव समितीच्या वतीने अनेक समित्या स्थापन करून सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर प्राचार्य डॉ बाबासाहेब हंगे डॉ शिवाजी शिंदे प्रा सय्यद लाला योगेश पवार विश्वंभर देशमाने डॉ सुधाकर गुट्टे प्राध्यापिका डॉ अनिता शिंदे डॉ रेखा गुळवे डॉ संतोष तळेकर डॉ आबासाहेब राठोड डॉ कटारे डॉ खेत्री प्रा सत्येंद्र पाटील प्रा जगताप प्रा सुधीर माने प्रा काकडे डॉ किशोर मचाले डॉ भागचंद सानप डॉ शरद पवार इत्यादी प्राध्यापकासह अनेक विविध महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत