क्राईम

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पंधरा लाखाची केली मागणी

बीड — वीट भट्टी चालका सोबत लगट करत याचे छायाचित्रण करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पंधरा लाख रुपयाची मागितल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हनी ट्रॅप च्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे.
केज तालुक्यातील टाकळी येथील वीट भट्टी चालक नितीन रघुनाथ बारगजे यांना आष्टी येथील एका महिलेचा विटा पाहिजेत म्हणून फोन आला. तुम्ही मांजरसुंब्याला या असे त्या महिलेने शुक्रवारी सकाळी सांगितले. दरम्यान सकाळी अकराच्या सुमारास नितीन बारगजे हे मांजरसुंबा येथे गेले. याठिकाणी सदर महिलेशी‌ बोलणे झाल्यानंतर या महिलेने मला पाटोद्याला जायचे आहे गाडी नसल्यामुळे तुम्हीच नेऊन सोडा असा आग्रह केला तेथे गेल्यानंतर पुढे आष्टी येथे सोडा असे सांगितले. आष्टी येथे गेल्यानंतर या महिलेने नितीन बारगजे यांना चहा पिण्यासाठी घरी चला असा आग्रह केला. नितीन बारगजे हे घरी गेल्यानंतर या महिलेने घराचे दार लावून यांच्याशी लगट केली याचे चित्रीकरण दुसऱ्या एकाने केले. हे अश्लील छायाचित्रीकरण व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देत त्यांच्याकडे पंधरा लाख रुपयाची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर दहा लाख रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम घेण्यासाठी केज येथे जाण्याचे नियोजन करण्यात आले. केज ला जाण्यासाठी बारगजे यांच्यासोबत शेखर वेदपाठक हा मोटरसायकलवर त्यांच्यामागून स्कॉर्पिओ गाडी काहीजण निघाले निघाले. शनिवार दिनांक 25 जुलै रोजी केज येथे आल्यानंतर मित्राच्या मदतीने वेदपाठक ला पकडण्यात आले. यावेळी पाठीमागून आलेली स्कार्पिओ गाडी झालेला प्रकार पाहून निघून गेली. यातील काही घटना मांजरसुंबा येथे घडलेली असल्यामुळे नितीन बारगजे यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात प्रशांत श्रीखंडे, कैलास गुजर, योगेश मुटकुळे ,शेखर वेदपाठक, वैभव पोकळे, सविता वैद्य सुरेखा शिंदे यांच्याविरोधात 324, 323, 384, 120 (ब ) भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भारत राऊत हे करत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close