आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये बार्टीच्या समतादुतांचे उल्लेखनीय कार्य

बीड — डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रक्षिशण संस्था, (बार्टी) पुणे च्या समतादूत प्रकल्पा अंतर्गत बीड जिल्ह्यातील जनतेमध्ये समतादूतांनी लॉकडाऊन कालावधीत कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती केली. तसेच एम.पी.एस.सी. पूर्व तयारीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी महत्व पूर्ण काम केले आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातीतील 59 जातींचे सर्वेक्षण बीड जिल्ह्यात करण्यात आले करण्यात आले.

तसेच विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून गरजूंना किराणा किटचे वाटप केले. आर. टी. ई. अंतर्गत (२५%) कोट्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी पालकांना मार्गदर्शन व मदत करण्यात आली. तसेच लॉकडाऊनच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार व प्रत्यक्ष मदत मिळवून देण्याची उल्लेखनीय कामगिरी बीड जिल्ह्यातील समतादूतांनी केली आहे. पाऊस पडल्यानंतर जुन व जुलैमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

१ ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी निमित्त ऑनलाईन राज्यस्तरीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सदर उपक्रमात सहभाग नोंदवावा यासाठी विविध माध्यमातून प्रचार व प्रसार करण्याचे काम समतादुत यांच्या मार्फत करण्यात आले. सदरील कामकाज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री मा. धनंजय मुंडे, बार्टीचे महासंचालक मा. कैलास कणसे व समतादुत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका श्रीमती. प्रज्ञा वाघमारे, बीड जिल्हा प्रकल्प अधिकारी सर्वेश्वर कोठूळे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादुत अमोल तांदळे, प्रदीप गुजर, रवींद्र नांदे, मधुसुदन मस्के, व्यंकटेश जोशी, आखेब सय्यद, पुरुषोत्तम स्वामी, ज्ञानेश्वर ढगे, तुकाराम शेवाळे, संजय गुजर, नानाभाऊ गव्हाणे, दिपक दहिफळे, सुग्रीव शिंदे, भिमा कामधारे, ज्ञानोबा म्हात्रे, श्रीमती वर्षा देशमुख कामकाज करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close