ताज्या घडामोडी

ढिसलेवाडी, वांगी साठवण तलावाची स्थिगिती उठवण्यात यश

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे प्रयत्न 

बीड — शिरूर तालुक्यातील रायमोह सह येवलवाडी वंजारवाडी सांगळवाडी डोळेवाडी ढिसलेवाडी दत्तनगर आणि बीड तालुक्यातील वांगी गावचा सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश आले असून यासाठी निविदा प्रसिध्द झाली आहे

साठवण तलाव ढिसलेवाडी 5.90 कोटी तर वांगी साठी 3.51 कोटी रुपयांची पुनर निविदा प्रकाशित.

साठवण तलाव ढिसले वाडी शिरूर तालुका जिल्हा बीड 1323 टिसीएम( सहस्त्र घनमीटर) एवढा पाणीसाठा असलेल्या या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण तलाव हा माती कामाने होणार आहे. सदरील योजना गोदावरी खोरे उपखोरे सिंदफणा नदी असे प्रस्तावित होते . या योजनेस जलसंपदा विभाग मार्फत दिनांक 18 फेब्रुवारी 2010 रोजी 1.08 Mcum पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाले होते.
जिल्हा जलसंधारण अधिकारी बीड 06 जुलै 2019 आणि प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभाग औरंगाबाद यांनी 03 ऑगस्ट 2019 ला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मागणीनुसार जलसंधारण महामंडळ कार्यालयामार्फत प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या अनुषंगाने अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्याकडे सादर केले होते.
अंदाजपत्रक 2017-18 चे दर सूचीनुसार 4.40 कोटी एवढे झाले होते. 251 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या साठवण तलावास व्यवस्थापकीय संचालक पुणे यांनी 11 सप्टेंबर 2019 ला प्रशासकी मान्यता प्रदान केली होती. पुढे शासन बदलल्यामुळे शासनाने याला स्थगिती ही दिली होती . पण माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रालय स्तरावर पाणी उपलब्धतेसाठी जलसंपदा मंत्री आणि अंदाजपत्रक रिवाईज करून प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रकाशित करणेबाबत जलसंधारण मंत्री यांना वेळोवेळी पाठपुरावा करून नवीन दरसुचीनुसार या साठवण तलावाची निविदा किंमत 5.90 कोटी आणि वांगी साठवण तलाव निविदा किंमत 3.51 कोटी एवढी करून घेतली. आता या साठवण तलावाची पुनरनिविदा प्रकाशित झाली आहे.रायमोह सह येवलवाडी वंजारवाडी डोळेवाडी दत्तनगर ढिसलेवाडी सांगळवाडी या गावांचा सिंचन प्रश्न लवकरच संपणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्पाच्या संदर्भात वरील गावांचे ग्रामस्थ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना भेटत होती निवेदन देत होती. या भागातील हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागावा काळ्या आईची तहान भागवी ऊसतोड मजुराचा हातातील कोयता निघावा म्हणून गेली अनेक वर्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर पाठपुरावा करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून ढिसलेवाडी साठवण तलावाची निविदा आता प्रकाशित झाली आहे. लवकरच हे काम मार्गी लागणार म्हणून या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत आणि त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचे आभार मानले आहे

2019 मध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्री पदाच्या काळामध्ये शिरूर तालुक्यात 33 बीड 11तालुक्यात असे एकूण 45 कोटी रुपयांची 44 कोल्हापुरी बंधारे मंजूर करून घेतले होते. ज्याची कामे आता पूर्ण झाली असून त्यांची एकूण साठवण क्षमता 3600 टीसीएम ( सहस्त्र घनमीटर) एवढी होत असून सिंचन क्षेत्र 1100 हेक्टर म्हणजे 2750 एकर एवढे होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button