80 हजाराची लाच घेताना उप कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

बीड — परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि. कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्याने राख वाहतुकीसाठी गेटपास देण्यासाठी खाजगी इसमा मार्फत 80 हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने रंगेहात पकडले या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल रामदास वाघ वय 36 वर्ष उप कार्यकारी अभियंता, परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी मर्यादित व खाजगी इसम आदिनाथ आश्रुबा खाडे वय 36 वर्ष,रा. शिवाजी नगर, परळी जि. बीड अशी लाचखोरांची नाव आहे. अभियंता अनिल वाघ याने परळी थर्मल केंद्राची राख वाहतूक करण्यासाठी तक्रारदारास वीस गेट पास देण्यासाठी प्रत्येक गेट पासला चार हजार रुपये प्रमाणे 80 हजार रुपयाची लाच मागितली.
हि लाच खाजगी व्यक्ती आदिनाथ खाडे याच्यापाशी देण्यास सांगितले. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात खाजगी व्यक्ती पंच साक्षीदारा समोर 80 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलीस अधिक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या टिमने केली. रविंद्र परदेशी, पोलीस निरीक्षक, पो.नि अमोल धस, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, भारत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.