देश विदेश

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोना ची लागण

लखनऊ — आमदारांनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची टेस्ट करण्याचं आवाहन शिवराज सिंह यांनी दिलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे.

तीन दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्री अरविंद भदोरिया मुख्यमंत्र्यांसोबत लखनऊ दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. ‘मला कोविड-19ची लक्षणं दिसत होती त्यामुळे मी चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे

‘मी कोरोनाच्या गाईडलाइनचं पूर्णपणे पालन करत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी स्वत:ला क्वारंटाइन करेन आणि कोरोनाचे तातडीनं उपचार घेईन असंही त्यांनी सांगितलं.’

‘कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मी संभाव्य काळजी घेतली होती. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी क्वारंटाइन करावं’ असं आवाहन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 48 हजार 916 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 13,36, 861वर पोहोचला आहे. यापैकी 4 लाख 56 हजार 071 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 24 तासांत कोरोनामुळे 757 लोकांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंत मृतांचा आकडा 31 हजार 358 वर पोहोचली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close