ताज्या घडामोडी
गोठ्याला लागलेल्या आगीत बारा शेळ्या भस्मसात

केज — गोठ्याला आग लागल्याने गोठ्यातील दहा ते बारा शेळ्या जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री उत्तरेश्वर पिंपरी येथे घडली.
महादेव लोलवा धेंडे यांच्या गोठ्याला शनिवार दि.24 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने मदत मिळण्याच्या आत लहान मोठ्या 10 ते 12 शेळ्या होरपळून मरण पावल्या आहेत, ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु यामध्ये धेंडे कुटुंबाची खूप मोठी आर्थिक हानी झाली आहे. हातावर पोट असणाऱ्या धेंडे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.