देश विदेश

अनलॉक –2 नंतर पुढे काय ? प्रधानमंत्री करणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली — प्रधानमंत्री नरेंद्र मोदी covid-19 या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी 27 जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहे.

या बैठकीत गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित राहणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य सचिवदेखील उपस्थित राहतील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ही सातवी संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत अनलॉक-२ नंतर पुढे काय? याविषयी विचार-विनिमय होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीत करोनाशी दोन हात करण्यासाठी यापुढे कशी तयारी असायला हवी? राज्याची आणि केंद्राची यासाठी काय रणनीती असायला हवी? याबद्दल चर्चा होणार आहे. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close