आपला जिल्हा

तालुक्यासाठी 700 मॅट्रीक टन युरिया खत उपलब्ध झाले आहे — आ.लक्ष्मण पवार

आ.लक्ष्मण पवारांच्या पाठपुराव्याला यश

गेवराई —  तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाही अशा तक्रारी आल्या होत्या, म्हणून आमदार लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पञ देऊन गेवराई तालुक्यासाठी 1500 मॅट्रीक टन युरिया खताची मागणी केली होती. दरम्यान तालुक्यासाठी 700 मॅट्रीक टन युरिया खत उपलब्ध झाले असल्याची माहिती आमदार लक्ष्मण पवार यांनी दिली असून, शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकारी यांनी तात्काळ खताचा पुरवठा करावा अशी मागणी आपण जिल्हाधिकारी याच्या कडे केली होती त्या अनुषंगाने आज पर्यंत 700 मॅट्रीक टन युरीया खत उपलब्ध झाले आहे. दोन दिवसात 300 मॅट्रीक टन युरिया उपलब्ध होईल असे आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकात म्हटले आहे
दिलेल्या प्रसिद्धी पञकात म्हटले आहे की तालुक्यातील शेतक-यांचे पेरणीचे दिवस सुरू आहेत पण युरिया खतांचा तुटवडा जाणवू लागला होता म्हणून अनेक शेतक-यांनी आ. पवार यांच्याकडे तक्रार केली होती म्हणून आ.पवारांनी तक्रारीची दखल घेत कृषीआधिकारी ढाकणे यांच्याकडे चौकशी केली असता खताचा तुटवडा आसल्याचे कृषी आधिकारी ढाकणे यांनी सांगीतले होते. आ पवार यांनी जिल्हाधिकारी यांना पञ देऊन गेवराई तालुक्याला 1500 मॅट्रीक टन युरीया खताची आवश्यकता आहे.
आ. पवार यांनी मागणी केलेल्या 1500 मॅट्रीक टना पैकी आज पर्यंत 700 मॅट्रीक टन युरिया उपलब्ध झाला आहे. आणखी 300 मॅट्रीकटन युरीया खताचा दोन दिवसात पुरवठा होईल अशी माहिती कृषी आधिकारी ढाकणे यांनी सांगीतले आहे. त्यामुळे शेतक-यांच्या तक्रारीची दखल घेत आ. पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पञ देऊन पाठपुरावा करून खत उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे आ. पवार यांचे शेतक-यांनी आभार मानले‌.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close