आपला जिल्हा

प्रत्येकानं कोरोना पासून स्वतःला सांभाळून काम करावं – अँड. अजित देशमुख

बीड — कोरोना महामारी हे आणखी काही काळ चालणारे एक संकट आहे. या काळात काम न करता घरात बसणे शक्य देखील नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोरोणाला सांभाळून काम करणे, शिस्त पाळणे आणि मास्क लावल्याशिवाय एकमेका समोर न बोलणे, हे महत्वाचे आहे. त्यामुळे कोरोणावर मात करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

सध्या बीड जिल्ह्यामध्ये कोरोणाचे पेशंट मोठ्या प्रमाणात निघत आहेत. आता हे प्रमाण ठरावीक ठिकाणावर राहिले नसून अनेक ठिकाणी हे पेशंट निघत आहेत. त्यामुळे जनतेने कोठेही फिरताना स्वतःची आणि स्वतः बरोबर इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे. आजही काही लोक रस्त्याने जाताना मास्क लावत नाहीत. पुड्या खाऊन थुंकतात अथवा कार्यालयाच्या आवारात मध्ये देखिल असे प्रकार करतात.

हे प्रकार किमान या काळात तरी टाळायला हवेत. मात्र लोकांना अजूनही शिस्त काय असते हे कळत नाही. कोरोना महामारी हे जगावर आलेले संकट आहे.

आपण आपल्या पातळीवर जिल्ह्याचा विचार करताना ज्या कोणाला क्वारंटाईन केलेले आहे अथवा कंटेनमेंट झोन जेथे म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, त्या सर्व लोकांनी त्या भागातून बाहेर न पडणे गरजेचे आहे. मात्र अधून मधून नाही तर सातत्याने अशा झोन मधून देखील लोक बाहेर येतात. हे दुर्दैवी आहे.

कोरोनाला तोंड देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. तरचं या महामारीला तोंड देणे सहज शक्य आहे. त्यामुळे आपल्या बरोबर इतरांची काळजी घ्यावी आणि स्वतःचा बचाव स्वतः करावा, असे आवाहन देखील अँड. देशमुख यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close