क्राईम

दोन महिन्याच्या बाळाला भेटण्यास येणार्‍या पित्याचा अपघाती मृत्यू

आष्टी — दोन महिन्यांच्या आपल्या बाळाला भेटण्यासाठी गावी येत असताना पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी फाट्या जवळ वळणावर दुचाकीचा ताबा सुटला अन् अपघात झाला यात पित्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली
आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील युवराज पोपट जगताप वय वर्ष 34 हा गेल्या अनेक वर्षांपासून शेवगांव तालुक्यातील भेंडा सहकारी साखर कारखान्यावर हमाली करायचा त्यामुळे कुटुंबासह कारखान्यावर राहत होता. पत्नीला दिवस गेल्याने ती माहेरी गेली होती. बाळंत झाल्यानंतर माहेरहून ती सासरी आल्यावर वडिल आपल्या दोन महिन्याच्या तान्हुल्याला भेटण्यासाठी शुक्रवारी गावाकडे येत असताना पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी फाट्यानजीक एका वळणावर दुचाकी क्रमांक एम.एच 12, डी.के.3566 वरील ताबा सुटुन पुलाच्या खाली जाऊन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मुत्यु झाला.ही घटना रात्री 9 च्या दरम्यान घडली. मृतावर पाथर्डी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या पाश्यात आई, वडिल, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button