नेकनूर:अज्ञात वाहनाने युवकास चिरडले

नेकनूर — नेकनूर मांजरसुंबा रोडवरील गवारी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने पंचवीस वर्षीय युवकास चिरडल्याची घटना शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सातच्या सुमारास घडली.
शरद भारत मेंगडे वय 25 वर्ष रा. सफेपुर ता बीड असं मृताचं नाव आहे.शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास अज्ञात वाहनाने युवकास चिरडले, गाडीचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे अक्षरशः डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे मृताची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या.मात्र पायातील बूटामुळे ओळख पटवण्यात आली. दरम्यान घटनास्थळी हुंडई कारचा साईड ग्लास तुटून पडलेला आढळून आला तसेच रक्तामुळे गाडीच्या चाकाचे व्रण रस्त्यावर उमटल्यामुळे ही गाडी चार चाकी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नेकनूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी शव नेकनूरच्या रुग्णालयात पाठवून दिले आहे.