राजकीय

लिंबागणेशच्या सरपंचपदी बाळासाहेब जाधव

ग्रामपंचायत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या ताब्यात

बीड — सर्वांचे  लक्ष लागलेल्या लिंबागणेश ग्रामपंचायतीत माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांचे समर्थक आणि सरपंच पदाचे उमेदवार बाळासाहेब जाधव हे विजयी झाले.

१८ डिसेंबर रोजी बीड आणि शिरूर तालुक्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि बाजी मारली होती. मात्र लिंबागणेश ग्रामपंचायत मतदानाच्या वेळी प्रभाग क्रमांक २ मतदान केंद्र क्रमांक २/८५ मधील
ईव्हीएम मशीनवरील बटनवर फेविक्विक टाकल्याचा प्रकार घडला होता.त्यामुळे लिंबागणेश च्या मतदानाची मतमोजणी झाली नव्हती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक २ मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी फेरमतदान घेण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी लिंबागणेश ग्रामपंचायत निवडणुकीत फेर मतदान घेण्यात आले.यावेळी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत शांततेत प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सायंकाळी बीड च्या शासकीय आय टी आय येथे मतमोजणी झाली.लिंबागणेश ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांचे समर्थक आणि सरपंच पदाचे उमेदवार बाळासाहेब जाधव यांना ७२७ मते घेऊन विजयी झाले. या निकालाने लिंबागणेश गाव जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. या निकालानंतर विजयी झालेले सरपंच बाळासाहेब जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे संपर्क कार्यालयात युवा नेते डॉ. योगेश भैया क्षीरसागर यांनी भव्य स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका दूध संघाचे विलास (बापू) बडगे,सखाराम मस्के, गिरीश देशपांडे, शिवाजी जाधव, कल्याण वाणी, राजाभाऊ गिरे, रत्नाकर वाणी, नवनाथ मुळे,प्रकाश जाधव, बन्सी काळे, अर्जुन घोलप, दादा गायकवाड, बन्सी जाधव आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button