आपला जिल्हा

कोरोनामुळे दिवसभरात तिघांचा बळी

बीड  — जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढत असून बीड शहरातील 60 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा लातूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. बुधवारी दिवसभरात हा तिसरा बळी आहे.
बीड शहरातील साठ वर्षीय व्यक्ती चा बुधवारी पहाटे अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या वृद्ध रुग्णास लातूर येथे घेऊन जाण्याचा निर्णय या व्यक्तीच्या कुटुंबाने घेतला. जिल्हा रुग्णालयातून दुपारी लातूर कडे रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना अंबाजोगाई जवळ गेल्यानंतर रुग्ण अत्यवस्थ झाला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णवाहिका थेट अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात घेऊन गेला येथे दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. आज दिवसभरात कोरोणा मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन वर जाऊन पोहोचली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 22 जणांचा बळी गेला आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close