क्राईम

बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचा बेशरमपणा, अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर टाकला स्वतःचा नग्न फोटो

बीड —  महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचा बेशरमपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यावेळी या प्रकल्प अधिकाऱ्यानं बेशरम पणाचा कळसच केला आहे. अधिकाऱ्यानं चक्क महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो पोस्ट केला. या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.
बीड शहरातील ही घटना असून बुधवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पूर्वीही या अधिकाऱ्यानं त्याचे खासगी फोटो ग्रुपवर शेअर केल्याची तक्रार महिलांनी केली होती.

Beed Icds urban नावाच्या फक्त महिलांच्या ग्रुपवर अधिकाऱ्यांचा स्वत:चा न्यूड फोटो पोस्ट करून चावटपणा

केला आहे. या प्रकारामुळे अनेक महिला ग्रुपमधून बाहेर पडल्या. तर या प्रकारामुळे काही महिलांच्या घरी भांडणही झाली. अंगणवाडी महिलाच्या ग्रुपवर असेही प्रकार चालतात काय, असं काही महिलांना त्यांच्या पतीनं सुनावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकारामुळे महिला प्रचंड चिडल्या आहेत.

बेशरम अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महिलांनी केली आहे. काम करताना सतत त्रास देत असल्याचा देखील महिलांनी आरोप केला आहे. अशा भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या अगोदर महिलां कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तवणूक केल्यामुळे या बेशरम अधिकाऱ्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसरीकडे, अंघोळ करतानाचा न्यूड फोटो मोबाइल हॅक करून बदनामी केल्याच्या अधिकाऱ्यांनं बनाव केला आहे. मात्र, या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि महिला आक्रमक गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. असे असले तरी प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आले नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close